- जीएसटीसह भलामोठा दंड; धोरणाचा विरोध की स्वीकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मार्च २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख रस्त्यांवर पार्किंग पॉलिसी राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार ‘पे अँड पार्क’ सुरू करण्यात आले आहेत.
कारवाईसाठी टोइंग व्हॅन नसल्याने पोलिसांकडून कारवाई होत नव्हती. महापालिकेने वाहतूक पोलिसांना टोइंग व्हॅन उपलब्ध करून दिल्या आहेत. या टोइंग व्हॅनद्वारे शुक्रवार (दि. २५) पासून कारवाईला सुरुवात होणार आहे. नो-पार्किंगसाठी ५०० रुपये दंड, टोईंग चार्जेस २०० रुपये, जीएसटी- ३६ रुपये, एकूण ७३६ रुपये असा भलामोठा दंड असणार आहे.
पार्किंग धोरणाला सामाजिक कार्यकर्त्यापासुन तर विरोधकांनी जोरदार विरोध केला होता. त्यावेळी योजना बारगळली होती. मात्र आता प्रशासक म्हणून आयुक्त धोरणाची अमलबजावणी करणार आहेत. त्यामुळे योजनेला विरोध होणार की स्वीकारली जाणार याकडे लक्ष लागले आहे.












