- आरोपींकडून कोयता, तलवार घातक शस्त्र जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मार्च २०२२) :- मोशी स्मशानभूमीजवळ दोघेजण शस्त्र घेऊन आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मोशी स्मशानभूमीजवळ सापळा लावून कारवाई केली. आरोपीकडे कोयता आणि तलवार अशी घातक शस्त्रे आढळून आली.
त्यांची चौकशी केली असता दोघांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोन वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. त्यांचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी ते शहरात आले. दोघांना अटक करण्यात आली आहे.
एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत. पोलीस शिपाई नितीन खेसे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पवन बंडू शिरसाठ (वय २२), अजय अश्रुबा दुनघव (वय २५, दोघे रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.












