न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२२) :- नेतृत्वाला दातृत्वाची आणि कर्तृत्वाची जोड दिली तर आयुष्यात भरघोस यश मिळतेच. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे बाळासाहेब गव्हाणे आहेत. अशा शब्दांत सुप्रसिद्ध किर्तनकार ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज पाटील आळंदीकर यांनी बाळासाहेब गव्हाणे यांचा गौरव केला ते बाळासाहेब गव्हाणे आणि ललिता गव्हाणे यांच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या किर्तनसोहळ्यात बोलत होते. यावेळी भोसरी परिसरातील विविध क्षेत्रातील सुमारे २५० जोडप्यांचा सत्कार सामाजिक कार्यकर्ते राहुलदादा गव्हाणे व किशोरभाऊ गव्हाणे यांच्यातर्फे करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना आमदार महेशदादा लांडगे म्हणाले की, बाळासाहेब गव्हाणे हे स्वामी समर्थांचे भक्त आहेत. त्यांच्या विचारांचे अनुकरण ते नेहमीच करत असतात. अडचणीच्या काळात खंबीरपणे मागे उभे राहून अडचणीतून बाहेर काढण्याचे काम बाळासाहेबांनी माझ्यासह अनेकांच्या बाबतीत केले आहे. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे वाक्य बाळासाहेबांनी आपल्या जीवनाचे तत्व केले आहे . यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे, उद्योजक कार्तिक लांडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे, अण्णासाहेब मगर बँकेचे माजी उपाध्यक्ष विठ्ठल सांडभोर, माजी महापौर सौ. मोहिनी लांडे, कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब लांडगे, माजी नगरसेवक पंडीत गवळी, जालिंदर शिंदे, मुख्याध्यापक विष्णुपंत फुगे, नगरसेवक देवीदास गोफणे, माजी नगरसेवक वसंतराव लोंढे, माजी नगरसेविका सौ. सुरेखा गव्हाणे, अण्णासाहेब मगर बँकेचे माजी संचालक लक्ष्मणराव काचोळे, सामाजिक कार्यकर्ते संदिप शिवले, पप्पूशेठ बोत्रे यांच्या सह शहरातील विविध मान्यवरांनी गव्हाणे परिवाराचा गौरव यावेळी केला.
दिलेला शब्द पाळणारा आणि निष्ठावान माणूस अशा मोजक्या शब्दात माजी आमदार विलास लांडे यांनी बाळासाहेब गव्हाणेंचा गौरव यावेळी केला. बऱ्याच कालावधीनंतर सर्व पक्षीय कार्यकर्ते एकाच व्यासपीठावर पहायला मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
सौ. रेखा किशोर गव्हाणे यांनी स्वागत केले. त्या म्हणाल्या, समाजाप्रती आपण नेहमी कृतज्ञ असले पाहिजे अशी शिकवण अण्णांनी आम्हाला दिली. त्याच भावनेने मी समाजात काम करत असते. सासूसासऱ्यांच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची संधी आम्हाला मिळाली यासारखे भाग्य नाही. माजी नगरसेवक महादेव गव्हाणे, शंकर गव्हाणे, सोमाजी गव्हाणे, कुशाभाऊ गव्हाणे, दत्तात्रय गव्हाणे, धनंजय गव्हाणे, राजाराम गव्हाणे, संजय गव्हाणे, शेखर गव्हाणे, विनोद गव्हाणे, श्रीकांत गव्हाणे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजय बोत्रे यांनी केले. श्री राहुल गव्हाणे यांनी आभार मानले.













