न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मार्च २०२२) :- मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाखाली आज पहाटे साडेचारच्या सुमारास केमिकल वाहून नेणारा टँकर पलटी झाल्याने मुंबई मार्गिक बंद झाली होती. टँकरमधून मोठ्या प्रमाणात केमिकल रस्त्यावर सांडल्याने व त्यावरून वाहने सरकू लागक्याने सुरक्षेच्या कारणास्तव मार्गिक बंद करण्यात आली होती.
या केमिकलवर माती व बारिक खडी पसरवत केमिकल बाजुला काढल्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेसवे ची मुंबई मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे.
पुर्णतः वाहतूक पुर्ववत होण्यास सायंकाळ होणार असे चित्र आहे. दरम्यान वाहतूक सुरु झाल्याने धिम्म्या गतीने का होईना पण वाहने पुढे सरकू लागली आहेत. वाहतूक सुरु झाली असली तरी घाट परिसरात वाहने सावकाश चालवा, असे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे.
















