- असे म्हणत दुकानदारावर तलवारीने वार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मार्च २०२२) :- दुकानातून पैसे न देता आरोपी जबरदस्तीने बूट व चप्पल घेऊन जात होते. त्यावेळी फिर्यादीने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. आरोपीने ”आम्ही पिंपरीतील भाई आहोत, तुला माहित नाही का, बूट खरेदीचे पैसे मागतो काय”, असे म्हणून फिर्यादीच्या हातावर तलवारीने वार केला.
त्यानंतर आरोपींनी दुकानातील अठरा बूट व चप्पल असा मुद्देमाल जबरदस्तीने लुटला. तसेच जाताना दुकान व वाहनांवर दगडफेक करीत नुकसान केले. हा गोंधळ पाहून परिसरातील व्यापाऱ्यांनी भीतीपोटी दुकाने बंद केली. ही घटना पिंपरी कॅम्पमधील जमतानी चौक येथे घडली.
गणेश परशुराम परब (वय २५, रा. महेशनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सिद्धार्थ गायकवाड, संतोष पवार (सर्व रा. मिलिंदनगर, पिंपरी) यांच्यासह आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून किरण प्रकाश डोंगरे हा फरारी आहे.
















