न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मार्च २०२२) :- आकुर्डीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलावाची स्थापत्य विषयक कामे मार्गी लागली आहेत. त्यामुळे हा जलतरण तलाव आजपासून (दि. ३०) १०० टक्के क्षमतेने कोविड पूर्व नियोजित वेळेनुसार नागरिकांसाठी सुरु करण्यात आला आहे. याबाबतचा आदेश पालिका आयुक्तांनी जारी केला आहे.
पालिकेचे शहरातील जलतरण तलाव हे शनिवार ते गुरुवार सकाळी ०६.०० ते १०.०० व दुपारी २.३० ते सायंकाळी ०६.३० या वेळात सर्वासाठी १०० टक्के क्षमतेने सुरु राहतील व साप्ताहिक सुट्टी शुक्रवारी राहील, असे आदेशात म्हटले आहे.