न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मार्च २०२२) :- कंपनीच्या साइटवरून ८६ हजार रुपये किमतीचे विविध प्रकारचे लोखंडी साहित्य चोरून नेणाऱ्या एकाला हिजवडी पोलिसांनी अटक केली. ही घटना वाकड येथील भूमकर चौक येथे घडली.
चंदू गोरख सकट (वय ३२, रा. गांधीनगर झोपडपट्टी, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी बादशहा महादेव माने (वय ५०, रा. बालाजी रेसिडेन्सी, न-हे) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
२६ मार्चला फिर्यादी माने यांचे लोखंडी प्राप्स, वेलर व्हर्टिकल व लेजर असे ८६ हजार रुपये किमतीचे साहित्य सकट याने टेम्पोतून चोरून नेले. हा प्रकार समोर आल्यानंतर माने यांनी पोलिसात तक्रार दिली. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
















