न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मार्च २०२२) :- हिंजवडी आयटी पार्क परिसरातील मुळा नदी जवळ अतिशय निर्जनस्थळी एका झाडावर युवतीचा मृतदेह आढळून आला आहे. मयत मुलीचा मृतदेह नदीच्या पाण्यात वाहून जाऊ कुणाला सापडू नये म्हणून, मारेकऱ्यांनी मयत मुलीला मारून तिचा मृतदेह झाडावर टांगला आहे.
मयत मुलीचा मृतदेह पूर्णपणे वाळून गेला आहे. हिंजवडी पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह पोस्टमॉर्टम आणि डीएनए टेस्टसाठी जवळील सरकारी हस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर, शस्त्रविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.