न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ एप्रिल २०२२) :- भोसरी पोलीस पेट्रोलिंग करत असताना अंकुशराव लांडगे सभागृहासमोर आले. आरोपी रहदारीच्या ठिकाणी हातगाडीवर ज्वलनशिल पदार्थाचा वापर करून धोकादायक पद्धतीने अंडी उकडून विक्री करत होता.
हातगाडी चालकावर पोलिसांचे पथक कारवाई करण्यासाठी गेले असता, आरोपीने पोलिसांना धमकावून मोठमोठ्याने आरडाओरडा केला. तसेच पोलीस कर्मचा-यांना धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी हातगाडी चालकाला अटक केली असून, भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
हा प्रकार बुधवारी (दि. ३०) घडला. पोलीस नाईक भिल्लू मानसिंग राठोड यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंगेश सूर्यकांत सोनटक्के (वय ३०, रा. अंकुशराव लांडगे सभागृहाच्या पाठीमागे, मुळगाव- सागवी, नांदेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.