- पोलिसांची घटनास्थळी धाव; तिघे अटकेत एक फरार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ एप्रिल २०२२) :- आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील गुजरात टायटन व दिल्ली कॅपिटल या क्रिकेट सामन्यावर आरोपी सट्टा घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसानी शनिवारी (दि. २) रात्री आठच्या सुमारास राजवाडेनगर येथील वैभव पैराडाईज या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक १०६ येथे छापा टाकला.
येथे आरोपी सामन्यावर सा लावत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी कारवाई करून आरोपीकडून आठ मोबाईल, जुगारासाठी लागणारे साहित्य व रोकड असा एकूण २७ लाख २५ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. दरम्यान आरोपीनी मला हात लावायचा नाही, माझी ओळख लाबपर्यंत आहे. काही कारवाई झाल्यास चांगले होणार नाही, अशी धमकी दिली. या आरोपीवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.
सनी ऊर्फ भूपेंद्र चरणजितसिंग गिल (वय ३८, रा. राजवाडेनगर, काळेवाडी), रिक्की राजेश खेमचंदानी (वय ३६ रा. डीलक्स थिएटरमागे, बलदेवनगर, पिंपरी), सुभाष रामकिसन अगरवाल (वय ५७, रा रेल्वे स्टेशनजवळ, नाणेकर चाळ, पिंपरी) यांना अटक असून सनी सुखेजा (रा. पिंपरी) हा फरारी आहे. ही कारवाई काळेवाडीतील राजवाडेनगर येथे करण्यात आली.