न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ एप्रिल २०२२) :- अपना वतन संघटनेकडून पिंपरीत शहरातील मुस्लिम समाजाच्या प्रश्नांवर एकदिवसीय ” विचारमंथन शिबीर ” आयोजित करण्यात आले होते. शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत पिंपरी चिचंवड एजुकेशन सोसायटीचे सचिव गुलाम शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या विचारमंथन शिबिरात पिंपरी चिचंवड शहरातील मुस्लिम समाजातील सर्वपक्षीय नेते व सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पिंपरी चिचंवड शहरातील मुस्लिम समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. शहरातील मुस्लिम कार्यकर्त्यांनी शहरातील उर्दू शाळा, मुस्लिम विद्यार्थ्यांची शैक्षणिक स्थिती, समाजातील गरीब दुर्बल घटकांच्या वैद्यकीय गरजा ,रोजगार, करिअर मार्गदर्शन शिबिरे, ग्रंथालय, कायदेशीर सल्ला केंद्र, कौटुंबिक कलह , आरक्षित असलेल्या परंतु ताब्यात नसलेल्या कब्रस्तानच्या जमिनी, वक्फ बोर्डाच्या जमिनींवरील अतिक्रमण, सांस्कृतिक भवन, व्यसनमुक्ती केंद्र, मुस्लिम आरक्षण, मुस्लिम समाजवरील अन्याय व अत्याचार अशा विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
या विचारमंथन शिबिरामध्ये अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख, जमियत उलेमाये हिंदचे हाजी गुलजार शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युसूफ कुरेशी, काँग्रेस पक्षाचे शहाबुद्दीन शेख, शिवसेनेचे हाजी दस्तगीर मणियार, भाजपचे फारुख इनामदार, समाजवादी पक्षाचे रफिक कुरेशी, आरपीआयचे अजिजभाई शेख, शाहरुख खान, आझाद समाज पक्षाचे रहीम सय्यद, वेलफेयर पार्टी ऑफ इंडिया चे सालार शेख, सामाजिक कार्यकर्ता फेहमिदा शेख, महाविकास समितीचे फरीद शेख, आझाद ग्रुपचे जमीर शेख, मौलाना अबुल कलाम संस्थेचे हाजी गुलाम रसूल, अखिल रहमानी समाज रौफ शेख, रक्षक संघटनेचे जमील औटी, स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशनचे अब्दुलमाजीद शेख, मुबीन शेख, मदद फाउंडेशन अन्वरअली शेख, शिकलगार समाज संघाचे सलीम शिकलगार, सरकार ग्रुपचे लतीफ सय्यद, रशीद शेख आदी मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमाचे आयोजन अपना वतन संघटनेचे पिंपरी चिचंवड कार्यध्यक्ष हमीद शेख, महिला अध्यक्ष राजश्री शिरवळकर, ऍड फारुख शेख, मलंग शेख, प्रकाश पाठारे, अस्लम शेख, अल्ताफ शेख, राम चिंतले यांनी केले.