न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ एप्रिल २०२२) :- पिंपरी कॅम्पातील साई चौक येथील लेजेंडस चॉईस मेन्स वेअर या दुकानात नामंकित कंपनीचा लोगो वापरून बनावट जीन्सची विक्री करणाऱ्या दुकानदाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
सुपरड्राय या विदेशी नामांकित कंपनीचे लेबल लावून जीन्स पॅन्ट ची विक्री सुरु होती. दुकानातून १५ लाख ६० हजार रुपयांच्या ३१२ नामांकित कंपनीच्या बनावट जीन्स आणि लेजेंडस चॉईस मेन्स वेअर या दुकानातून १० लाख रुपये किंमतीच्या २०० बनावट जीन्स असा एकूण पंचवीस लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे.
महेंद्र सोहन सिंग (वय ३६, कसबा पेठ पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार इस्माइल इस्तेखार खान (वय २६, रा. मोरवाडी, पिंपरी) याच्या विरोधात कॉपीराईट हक्काचे उल्लंघन प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.