न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ एप्रिल २०२२) :- राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या पार्श्वगायिका सावनी रवींद्र यांना पिंपरी चिंचवड कल्चरल फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा पहिला कलाविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
पिंपरी चिंचवड कल्चरल फाउंडेशनच्या कार्यकारिणीची नुकतीच कासारवाडी येथील हॉटेल कलासागरच्या सभागृहात बैठक संपन्न झाली. या बैठकीत फौंडेशनच्या वतीने दिला जाणारा पहिला कलाविभूषण पुरस्कार चिंचवड येथील प्रसिद्ध गायिका सावनी रविंद्र यांना देण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला असून १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त सावनी रवींद्र यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष विजयराव भिसे यांनी दिली.
यावेळी पार पडलेल्या या बैठकीस सभेत फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजयराव भिसे, माजी अतिरिक्त आयुक्त अमृतराव सावंत, डॉ रवींद्र घांगुर्डे, माजी नगरसेविका सुजाता पालांडे, राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश पदवीधरच्या अध्यक्षा शिल्पा बिडकर, जीवन भोपे, निलांबरी भिसे आदि सदस्य उपस्थित होते.