न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ एप्रिल २०२२) :- कोरोना काळात मागील दोन वर्षापासून सर्व समारंभ सणावर बंदी असल्याकारणाने नागरिकांना उत्सव साजरे करता येत नव्हते. मात्र यावेळी कोणतेही निर्बंध नसल्या कारणानाने इंद्रायणीनगर, स्पाईनरोड शोभायात्रेला नागरिकांच्या प्रचंड उत्साह आणी प्रतिसाद होता. ही शोभायात्रा अत्यंत नियोजनबद्ध व शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आली होती. यामध्ये २०० ते ३०० महिला बाईक घेऊन तर ४०० पुरुष बाईक घेऊन शोभायात्रेत सहभागी झाले होते.
या शोभायात्रेत इंद्रायणीनगर मोशी प्राधिकरण येथील विविध सामाजिक संस्था, महिला भगिनी, विविध क्षेत्रातील मान्यवर, तसेच सर्व स्वयंसेवक बंधू स्वयंसेविका सहभागी झाले होते. या शोभायात्रेला भारत मातेच्या फोटोला पुष्प हार घालून स्पाईनरोड सर्कल मधून सुरवात झाली तसेच स्पाईन रोड मार्गे इंद्रायणी नगर मार्गे पुन्हा स्पाईनरोड सर्कल येथे येऊन सांगतां झाली. यावेळी जय श्रीरामच्या घोषणा देत ऐकमेकांना नविन मराठी वर्षीच्या शुभेच्छा दिल्या. पारंपरिक पध्दतीने शोभायात्रेची सांगता झाली. यावेळी नागरिकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्थेची अनिल सौंदडे मित्रपरिवाराने उत्त्मरित्या केली होती.
यावेळी आमदार महेश दादा लांडगे, विनायकराव थोरात, हेमंत राव हरहरे, विलासजी लांडगे सचिन भैय्या लांडगे, विलासजी मडीगिरी, योगेशजी लोंढे, नम्रता ताई लोंढे, शिवराजजी लांडगे, निलेश जी मुटके तसेच सर्व पोलिस प्रशासन व यंत्रणा, सर्व नगर संच, सहभागी हिंदूत्ववादी संघटना, सामाजिक संघटना यांचे विशेष सहकार्य लाभल्याबदद्ल सामाजिक कार्यकर्ते अनिल सौंदडे यांनी सर्वाचे आभार मानले.
















