- प्राइज आणि प्रॉफिट संस्थेचा उपक्रम
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ फेब्रु.) :- साखर कारखान्यांसाठी “जीएसटी आणि परिव्यय लेखापरीक्षण” विषयावर परिसंवादाचे आयोजन केले असल्याची माहिती, परिव्यय लेखापरीक्षक आशिष देशमुख यांनी दिली आहे.
सेमिनारचे उदघाटन दि ९ रोजी स. १० वा. कासारवाडी येथील हॉटेल कलासागर येथे होईल. यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड, जीएसटीचे संयुक्त आयुक्त प्रशांत नांदेडकर, परिव्यय लेखापरीक्षक धनंजय वात्स्यायन, परिव्यय लेखापरीक्षक महेंद्र भोंबे आदी उपस्थित राहणार आहे.
यावेळी धनंजय कुमार वत्सयान हे परिव्यय लेखापरीक्षण आणि खर्च कमी करण्यासाठी साखर कारखान्यातील संभाव्य संधी ओळखणे तर आशिष देशमुख हे काम आणि जीवनाचा ताळमेळ कसे ठेवायचे यावर मार्गदर्शन करणार आहे. या परिसंवादात आगामी जी.एस.टी लेखापरीक्षा समस्यांचे निराकरण, आपल्या चुकून दाखल केलेल्या जी.एस.टी रिटर्नमध्ये सुधारणा करण्यास मदत होईल.
जी.एस.टी च्या अनुपालनावर आपल्या कंपनीच्या प्रचंड व्याज आणि दंड वाचविण्यात मदत, जी. एस. टी योग्य रिटर्न्स भरणे, जी. एस. टी रिटर्न्समध्ये दुरुस्ती करणे, ब्लॉक क्रेडिटवर चर्चा आणि नियम ४२ आणि ४३ जी. एस. टी नियमांची – इनपुट कर क्रेडिट रिव्हर्सल, जी. एस. टी कायदा आणि नियमांमध्ये अलिकडील दुरुस्तीची चर्चा होईल. संपूर्ण कार्यक्रम मराठीतून असणार आहे.











