- ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा मार्गदर्शन करणार
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ फेब्रु.) :- बांधकाम मजुराच्या विविध प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी आणि बांधकाम मजुराच्या विविध योजनांचा लाभ कष्टकरी बांधकाम मजुरापर्यंत पोहोचवावा, त्यांच्यात जागृती व्हावी यासाठी गुरुवार (दि. ०७) रोजी साय. ४ वाजता पिंपरी येथील महात्मा फुले पुतळा येथे माता रमाई बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कष्टकरी मेळावा आयोजित केला आहे.
यावेळी ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा हे मार्गदर्शन करणार असून, त्यांच्या हस्ते बांधकाम मजुरांना ओळखपत्र वाटप केले जाणार आहे. राष्ट्रसेवा दलाचे मेहबूब ईनामदार संपतराव कांबळे, दत्ता पाकिरे आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कष्टकरी कामगार पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली आहे. बांधकाम कामगारांसाठी सरकारने कल्याणकारी महामंडळ स्थापन केले आहे. याआधारे विविध योजनांचा लाभ बांधकाम मजुरांना दिला जात, असून या योजना बांधकाम मजुरांपर्यंत पोहचण्यासाठी कष्टकरी कामगार पंचायत प्रयत्न करत आहे.
यावेळी पिंपरी-चिंचवड शहरातील बांधकाम मजुरांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बाबा कांबळे यांनी केले आहे.











