न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ एप्रिल २०२२) :- जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपी व फिर्यादी यांचा मुलगा श्रीपाद (वय ३०) यांच्यात झालेल्या भांडणावरून आरोपी त्यांच्या घरासमोर आले. आम्ही त्याला मारण्यासाठी आलो आहे, असे म्हणत शिवीगाळ केली.
आरोपी गिरीश याने खिशातून पिस्तूलच्या आकाराचे कव्हर काढले. त्यामध्ये पिस्तूल असल्याचे सांगत श्रीपाद याला गोळ्या घालून मारण्याची धमकी दिली. निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
आकुर्डीगावातील पाढरकर वस्ती येथे ही घटना घडली. मोहन सुंदर यादव यांनी फिर्याद दिली आहे. गिरीश विजय मानकर (वय ३५, रा. नाना पेठ) याला निगडी पोलिसांनी अटक केली. तर तीन साथीदारांवर गुन्हा दाखल आहे.