न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ एप्रिल २०२२) :- पीएमपीएमएलने शहरी ग्रामीण भागासाठी असलेला दैनंदिन ७० रुपयांचा तर १४०० रुपयांचा पास १ एप्रिलपासून बंद केला आहे. त्यामुळे महापालिका हद्दीबाहेर पीएमपीएमएलने प्रवास करताना तिकीट काढण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय प्रवाशांसमोर राहिलेला नाही. या निर्णयाचा फटका महापालिका हद्दीबाहेरील प्रवाशांना बसणार आहे.
ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या नागरिकांचा या सेवेला प्रतिसादही मिळत होता. ७० रुपयांमध्ये दिवसभर तर १४०० रुपयांच्या मासिक पासामध्ये महिनाभर संपूर्ण पीएमपीएमलच्या संचलन क्षेत्रात प्रवास करता येत होता.
पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत फिरण्यासाठी दैनंदिन ४० रुपयांचा पास आहे, तर पुणे आणि पिंपरी या दोन्ही महापालिका हद्दीत फिरण्यासाठी ५० रुपयांचा पास आहे. महापालिका हद्दीबाहेर जाण्यासाठी कोणताही पास नाही.
– दत्तात्रय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल…