न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ एप्रिल २०२२) :- महापालिकेच्या पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील वैद्यकीय पदव्युत्तर संस्थेत पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्युटमध्ये नेत्ररोग, त्वचारोग, क्ष किरण तज्ज्ञ आणि उरोरोग हे चार कोर्सेस सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी १ लाख ७३ हजार रुपये शुल्क मुंबईच्या कॉलेज ऑफ फिजिशियन अॅन्ड सर्जन (सीपीएस) या अधिमत विद्यापीठाला भरण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली.
रुग्णालयात मुंबईच्या कॉलेज ऑफ फिजिशियन अॅण्ड सर्जन या अधिमत विद्यापीठाची मान्यता असलेले एमबीबीएसनंतरचे ११ वैद्यकीय शाखांचे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्सेसकरिता १६ सीपीएस डॉक्टरांच्या जागांना मान्यता देण्यात आली आहे. वायसीएम रुग्णालयात सन २०१७-१८ पासून पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.
त्यामध्ये स्त्रीरोग, बालरोग, विकृतीशास्त्र, भूलशास्त्र, कान, नाक व घसा, अस्थिरोग आणि मानसोपचार आदी विषय समाविष्ट आहेत. त्यामुळे अभ्यासक्रम वायसीएम रुग्णालयात राबविता येणार नाहीत. उर्वरित नेत्ररोग, त्वचारोग, क्ष किरण तज्ज्ञ, उरोरोग आदी विषय राबविले जाणार आहेत. त्यासाठी १ लाख ७३ हजार शुल्क भरावयाचे आहे. त्या खर्चास स्थायी समितीने मंजुरी दिली.