न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ एप्रिल २०२२) :- प्रेयसीने तिच्या पतीपासून घटस्फोट न घेता प्रियकराला धोका दिला. वेगवेगळ्या कारणावरून त्याला त्रास देऊ लागली. अखेर प्रियकराने स्वतःला संपविले. हिंजवडीतील भूमकर वस्ती येथील रॉयल इंटरडा सोसायटीतील राहत्या घरी बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्येशिवाय पर्याय नाही, अशी सुसाईड नोटही प्रियकराने लिहून ठेवली. दरम्यान त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ३२ वर्षीय प्रेयसीवर गुन्हा दाखल झाला आहे.
ही घटना १३ डिसेंबर २०२१ दरम्यान घडली. सुहास लक्ष्मण ओल्लालवार (वय ३५ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नावे आहे. तरुणाच्या वडिलांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.