न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ एप्रिल २०२२) :- शहर व जिल्ह्यातून २४ महिन्यांसाठी आरोपीला २ सप्टेंबर २०२० रोजी तडीपार करण्यात आले आहे. आरोपीने आदेशाचा भंग करून, लोखंडी कोयता जवळ बाळगला होता.
पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली. पुनावळेतील समीर भुजबळ चौक येथे मंगळवारी (दि. ५) ही कारवाई करण्यात आली. अमोल उर्फ धन्या गजानन गोरगले (वय ३२, रा. समीर भुजबळ चौक, जिल्हा परिषद शाळेमागे, पुनावळे) असे अटक आरोपीचे नाव आहे. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.