- तरुणाला बेदम मारहाण; आरोपींना अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ एप्रिल २०२२) :- देहू-आळंदी रोडवर असलेल्या चौधरी ढाब्यात फिर्यादीचा मित्र आणि आरोपी यांचा किरकोळ कारणावरून शाब्दिक वाद झाला. त्यातून आरोपींनी ‘तुला जास्त मस्ती आली आहे. थांब तुला खलास करून टाकतो’ असे म्हणत लाथाबुक्क्यांनी आणि खुर्च्यांनी, लाकडी बांबूने तरुणाच्या छातीवर, पोटावर, हातावर, डोक्यावर मारून गंभीर जखमी केले.
ठार मारण्याचा आरोपींनी प्रयत्न केला आहे. हा प्रकार सोमवारी (दि. ४) रात्री पावणे बारा वाजता घडला. ऋषिकेश काशिनाथ तांबे (वय २३, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ऋषिकेश यांचा मित्र अजय युवराज बोत्रे असे जखमी तरुणाचे नाव आहे. शुभम सस्ते, त्याच्या सोबतचा अनोळखी इसम, किशोर पवार आणि त्याच्या सोबतचे तीनजण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.