- तरुणीला दिले आगीचे चटके; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ एप्रिल २०२२) :- तरुणी मंगळवारी दुपारी घरी असताना दोन तरुण तिच्या घरी आले. तुमच्या रूममधून पाण्याचा कॅन घ्यायचा आहे, असे म्हणून एका आरोपीने तरुणीच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर फिर्यादी तरुणीसोबत गैरवर्तन केले. त्यामुळे फिर्यादी यांनी स्टीलचा झाऱ्या आरोपीला फेकून मारला.
आरोपीने त्याच्या दुसऱ्या साथीदाराला घरात बोलावून घेतले. त्यानंतर तरुणीसोबत शरीरसंबंधासाठी जबरदस्ती केली. जाळून टाकू, अशी धमकीही आरोपींनी दिली. पेटलेल्या सिगारेटने तरुणीला चटका देण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने झटका दिल्याने सिगारेट खाली पडली. त्यांनतर आरोपींनी झाऱ्या गॅसवर गरम केला आणि त्याने तरुणीच्या हातावर चटका दिला. तरुणीसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला, असे फिर्यादीत नमूद आहे.
हिंजवडी येथे मंगळवारी (दि. ५) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पिडीत १८ वर्षीय तरुणीने गुरुवारी (दि. ७) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन अनोळखी तरुणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.