न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ एप्रिल २०२२) :- शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आरोपीने त्याच्या घरी साठवून ठेवला असून तो त्या गुटख्याची विक्री करत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हरगुडेवस्ती, चिखली येथे बुधवारी (दि. ६) दुपारी पावणे एक वाजता आरोपीच्या घरी छापा मारून कारवाई केली.
या कारवाईमध्ये पोलिसांनी २२ हजार २५२ रुपयांचा गुटखा, सुगंधित तंबाखू आणि पानमसाला जप्त केला आहे. पोलीस नाईक संदीप पाटील यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रमेश बाबूराम सिरवी (वय २६ रा. हरगुडेवस्ती, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.चिखली पोलीस तपास करीत आहेत .