- उन्नति विठाई वाचनालयास पुस्तकांचा संच भेट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ एप्रिल २०२२) :- पिंपळे सौदागर येथील लायन्स क्लबच्या वतीने विविध वाचनीय, मनोरंजक मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील १०० उत्तम पुस्तकांचा संच उन्नति विठाई वाचनालयास भेट देण्यात आला.
यावेळी विठाई वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. सुभाषचंद्र पवार, उपाध्यक्ष रमेश वाणी, फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे, अध्यक्षा कुंदाताई संजय भिसे, सामाजिक कार्यकर्ते समीर काटे, अंजुम सय्यद, अध्यक्षा लायन्स क्लब, गुलशन नाईकवडे, शोभा देवरे व इतर वाचनालयाचे सभासद उपस्थित होते.
कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या, पुस्तक ही आपली सगळ्यात चांगली मित्र असतात, असे म्हणतात. काही पुस्तकं करमणुकीची साधनं म्हणून वाचली जातात. काही ज्ञानाचे भांडार म्हणून तर काही पुस्तकं आयुष्यातल्या समस्यांचा तोडगा काढण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. पुस्तक वाचल्याने मस्तक तयार होते
आणि मस्तक तयार झाल्यावर माणूस. तो कोठेही नतमस्तक होत नाही. पुस्तके ही प्रेरणेचे भांडार आहेत ती वाचून आपल्याला जीवनात चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळते. आपले विचार व भावना दुसऱ्यांपर्यंत पोहचवण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे पुस्तके होय. लायन्स क्लबचे खुप आभार.
लायन्स क्लबच्या अध्यक्ष अंजुम सय्यद म्हणाल्या, उन्नति सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई संजय भिसे गेली बरीच वर्षे झाली समाजपयोगी उपक्रम राबवत आहेत. काळाच्या प्रत्येक गरजेच्या वेळी नागरिकांसाठी कार्यरत आहेत. इथुन पुढेही राहतील. पिंपळे सौदागरमध्ये नागरिकांसाठी मोफत उन्नती विठाई वाचनालयाची सुरुवात केली त्याबद्दल सर्व नागरिकांच्या वतीने कुंदाताई संजय भिसे यांचे खूप धन्यवाद.