न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ फेब्रु.) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी केवळ बौद्धच नव्हे, तर त्यांच्याबरोबर मातंग समाजालाही बरोबर घेऊन त्यांचा विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. सवलती सर्वच मागास जातींना मिळवून दिल्या; पण तरीही मातंग समाज मागेच राहिला. त्याला अनेक कारणे आहेत. मातंग समाज मागे पडण्याचे मुख्य कारण शिक्षणाच्या तसेच संसदबाह्य दबावगटाच्या राजकारणाच्या अभावातही आहे.
आत्मोन्नतीसाठी आंदोलने करावी लागतात याचे भान दुर्दैवाने मातंग समाजाला फारसे आलेच नाही. शासनाने म्हणूनच आता मातंग समाजाला विकासाच्या प्रक्रियेत सामील करून घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. शिक्षण, आरोग्य, शेती प्रश्न, घरकुल योजना, कर्ज, अनुदान अशा विकास योजनांचा त्यांना फायदा मिळवून देण्याकरीता लहुजी शक्तीसेना संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा लहुजी शक्तीसेना पिंंपरी-चिंचवड शहरप्रमुख युवराज दाखले यांचे प्रयत्न चालू आहेत. तसेच अनुसूचित जातीसाठी आंध्रप्रदेशच्या धर्तीवर एकूण १३ टक्के स्वतंत्र आरक्षण मातंग समाजाला देण्यात यावे, यासाठी दाखले यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना साकडे घातले आहे. याबाबत त्यांनी ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली व त्यांना महाराष्ट्रातील मातंग समाजास १३% आरक्षण लोकसंखेच्या अ, ब, क, ड प्रमाणे वर्गीकरण करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाच्या प्रलंबीत मागण्यांसाठी लहुजी शक्तीसेना संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालु आहे. या आंदोलनास समाजाचा महाराष्ट्र तसेच अकोल्यातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून, आरक्षणासाठी कसबे यांनी तीन किलोमीटर लोटागंन आदोलन नुकतेच केले आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी समाज आणखीनच अक्रमक होताना दिसत असल्याची माहीती, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दाखले यांनी दिली.
याबाबत उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली व आमदारांची या प्रश्नी मातोश्रीवर बैठक घेऊन, समाजाच्या मागणीसाठी पक्षाकडून जोर धरीत मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले आहे, असे शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा लहुजी शक्तीसेना पिंंपरी चिंचवड शहरप्रमुख युवराज दाखले सांगितले.
शिवसेना सचिव मिलींद मिर्लेकर, सुरज चव्हाण, माजी आरोग्यमंञी डॉ. दिपक सावंत, राजपुत महामोर्चाचे प्रदेश अध्यक्ष अजयसिंग राजपुत, शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश सचिव गणेश आहेर, मारूती म्हस्के, मनोज कपोते, गोरख पाटील आदी यावेळी उपस्थित होते.











