- नागरिक भयभीत; पोलिसांचा तपास सुरु…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२२) :- त्रिवेणीनगरात कॅनरा बँकेचे एटीएम जिलेटिनच्या साह्याने स्फाेट करुन फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला आहे. ही घटना आज गुरुवार (दि. २१) रोजी पहाटेच्या सुमारास घडली.
घटनास्थळावर एटीएम मशिनच्या चिंधड्या उडाल्या हाेत्या. त्याचे काही भाग रस्त्यावर विखरले हाेते. पाेलिसांना घटनेची माहिती समजताच घटनास्थळी धाव घेतली. बॉम्ब शोध व नाशक पथक आले. त्यांना बॉम्बसदृश्य वस्तू जाग्यावर सापडल्याची प्राथमिक मिळत आहे.
दरम्यान मोठा आवाज झाल्याने नागरिक भयभीत झाले. अनेकजण घराबाहेर तसेच इमारतीच्या बाहेर आले. त्यावेळी काहींना गगनगिरी मठाच्या समोरील एटीएम सेंटरमधून धूर बाहेर येत असल्याचे दिसले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.
















