- कृष्ण प्रकाश यांची मुंबईत बदली; अंकुश शिंदे नवे पोलीस आयुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० एप्रिल २०२२) :- पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची बदली झाली आहे. अंकुश शिंदे यांची पिंपरी – चिंचवडच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य गृह विभागाने राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या आज बुधवारी (दि. २०) सायंकाळी बदल्याचे आदेश पारित केले आहेत. कृष्ण प्रकाश यांची विशेष पोलिस महानिरीक्षक (व्ही.आय.पी. सुरक्षा) महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. तर विशेष पोलिस महानिरीक्षक सुधार सेवा, मुंबई येथे कार्यरत असणारे अंकुश शिंदे यांची पिंपरी – चिंचवडच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
















