न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२२) :- प्रभाग क्र. ८ इंद्रायणीनगर येथील रोड लगतच्या फुटपाथवरील १६ टपऱ्या, १२ अनधिकृत पत्राशेड तसेच साधारण ५७०० चौ .फु. व ४१ हातगाड्यांवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी (दि. २०) कारवाई केली.
या कारवाईत अतिक्रमण निरीक्षक संतोष शिरसाठ, बीट निरीक्षक प्रसाद आल्हार, निवृत्ती गुणवरे, योगेश शेवलकर, राजश्री सातळीकर, सुपरवायझर पंकज वापेक, प्रभाग अतिक्रमण पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल व महाराष्ट्र पोलीस पथक सहभाग झाले होते.
दररोज शहराच्या विविध भागात अतिक्रमण कारवाई केली जात आहे. नागरिकांनी रस्त्यावर अनधिकृत टप-या व शेड उभारु नये तसेच फुटपाथ स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.