न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२२) :- राज्यातील काही जिल्ह्यातील महानगरपालिका निवडणुकांचा प्रश्न प्रलंबित आहे. महापालिका निवडणुकी बाबतची सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली असून ती आता २५ एप्रिल रोजी होणार आहे.
आजच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाकडून याचिका फेटाळली जाऊन निवडणूक प्रक्रिया सुरू होईल, अशी आशा इच्छूक उमेदवारांना होती. त्यामुळे सर्व नेते, माजी नगरसेवक, आणि इच्छूकांच्या नजरा आजच्या सुनावणीकडे होत्या. सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याने महापालिका निवडणुका आणखी लांबतात की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.