- पालिकेकडून १९ अनधिकृत नळजोड आणि ६ विद्युत मोटर्स जप्त…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२२) :- प्रभाग क्रमांक ११ मधील तुळजाईनगर, नेवाळे वस्ती येथे महानगरपालिकेकडून १९ अनधिकृत नळजोड बंद करण्यात आले. पालिकेच्या थेट नळाला लावलेल्या एकूण ६ विद्युत मोटर्स जप्त करण्यात आल्या.
ही कारवाई १ उपअभियंता, १ कनिष्ठ अभियंता, २ मीटर निरिक्षक, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे ६ कर्मचारी, मनपाचे २ फिटर, ४ मजूर, २ वायरमन, अतिक्रमण गाडी चालकासह फ प्रभागाचे उपअभियंता शहाजी गायकवाड आणि कनिष्ठ अभियंता संजय जाधव यांच्या १९ जणांच्या पथकाने केली.