- रसवंतीगृह, सरबत आणि आंबा विक्रेते टार्गेट…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२२) :- अन्न व औषध औषध प्रशासन विभागाकडून (एफडीए) तळवडे येथील खाद्य बर्फ उत्पादकाला काही त्रुटी आढळल्याने नोटीस बजावण्यात आली आहे. इथेनिल गॅसचा उपयोग करून आंबा पिकविण्याचा प्रकार समोर येत असल्याने भोसरी येथे आंब्याचा नमुना घेण्यात आला आहे. तसेच एकूण १० रसवंतीगृह आणि सरबत विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.
उन्हाळ्याच्या कालावधीत रंगीबेरंगी सरबत, शीतपेय, ऊसाचा रस आदींना मागणी वाढली आहे. त्यामध्ये वापरण्यात येणारा खाद्य बर्फ आहे का, याची तपासणी एफडीए’कडून सध्या केली जात आहे. एफडीए’च्या वतीने तळवडे पिंपरी चिंचवड, पिंपळे सौदागरअशा एकूण १० ठिकाणी सरबत विक्रेते आणि रसवंतीगृहांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये काही विक्रेत्यांकडे परवाना आढळलेला नाही. तर, काही विक्रेत्यांकडे खाद्य बर्फाची बिले मिळालेली नाही. खाद्य बर्फ खरेदी करताना त्याची बिले जवळ ठेवा, असे आवाहन विक्रेत्यांना करण्यात आले आहे.
बिले न बाळगणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल, असे एफडीए’चे सहायक आयुक्त अर्जुन भुजबळ यांनी सांगितले. तळवडे येथील खाद्य बर्फ उत्पादकाला काही त्रुटी आढळल्याने नोटीस बजावण्यात आली आहे. इथेनिल गॅसचा उपयोग करून आंबा पिकविण्याचा प्रकार समोर येत असल्याने भोसरी येथे आंब्याचा नमुना घेण्यात आला. मोशी आणि भोसरी येथे एकूण ६ आंबा व केळी विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली.