- तीस जणांचे पथक अनं १९ विद्युत मोटर्स जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २० फुलेनगर येथे थेट महापालिकेच्या नळाला लावलेल्या एकूण १९ विद्युत मोटर्स जप्त केल्या.
ही कारवाई उपअभियंता, कनिष्ठ अभियंता यांच्यासह बीट निरीक्षक राजदीप तायडे, मीटर निरिक्षक हटकर, प्लंबर वारे आणि भाईप, तसेच राज्य राखीव सुरक्षा बलाचे २२ कर्मचारी, मनपाचे २ फिटर, ६ मजूर, २ वायरमन, १ अतिक्रमण वाहनासह चालक अशा एकूण ३० जणांच्या पथकाने केली.
ह प्रभागाचे उपअभियंता प्रकाश सगर, चंद्रकांत मोरे, कनिष्ठ अभियंता शाम गर्जे, दिग्विजय पवार, सन्मान भोसले यांच्या पथकाने सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामनाथ टकले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली