न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२२) :- मारहाण करून फिर्यादीच्या ताब्यातील दीड लाख रुपये किंमतीची रिक्षा जबरदस्तीने हिसकावून नेली. जबरदस्तीने हिसकावून नेलेली रिक्षा आरोपीकडे मिळून आली.
टावर लाइन रोड, मोरेवस्ती, चिखली येथे गुरुवारी (दि. २८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. हनुमान एकनाथ निंबाळकर (वय २५, रा. ताम्हाणे वस्ती, चिखली) यांनी या प्रकरणी शुक्रवारी (दि. २९) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
गौरव अनिल सरोदे (वय २५, रा. टावर लाइन, मोरेवस्ती, चिखली) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.