न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२२) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शस्त्रबंदीचा आदेश आहे. असे असताना दोघांनी चार कोयते जवळ बाळगले. आरोपींनी नियमांचे उल्लंघन केले.
हा प्रकार वेताळनगर चिंचवड, येथे गुरुवारी (दि. २८) सायंकाळी पाच वाजता घडला. पोलीस शिपाई मोहसीन युसुफ अतार यांनी याबाबत चिंचवड पोलीसात फिर्याद दिली आहे.
तेजस नितीन वायदंडे (वय १९, रा. वेताळ नगर, चिंचवड) आणि अभय शिवप्रसाद सुपेकर (वय २०, रा. चिंचवडगाव) असे शस्त्र विरोधी पथकाने अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. चिंचवड पोलीस अधिक तपास करीत आहेत.
















