- शिवसेनेचे उपशहरप्रमुख हरेश नखाते यांचा उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मे २०२२) :- शिवसेनेचे उपशहरप्रमुख हरेश नखाते यांच्या वाढदिवसानिमित्त ४ मे रोजी (बुधवारी) भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. काळेवाडी आणि रहाटणी प्रभागातील जास्तीत जास्त नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन हरेश नखाते यांनी केले आहे.
हरेश नखाते यांच्या काळेवाडी, ज्योतिबा नगर येथील जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी सकाळी ९:३० ते दुपारी ३ या वेळेत हे शिबीर संपन्न होणार आहे. शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर, खासदार श्रीरंग बारणे, शहर संपर्कप्रमुख वैभव थोरात या मान्यवरांच्या हस्ते या भव्य महाआरोग्य शिबिराचे उदघाट्न करण्यात येणार आहे.
या शिबिरात चिंचवडच्या लोकमान्य हॉस्पिटलच्या वतीने अस्थिरोग, हृदयरोग, स्त्री रोग व कर्करोग आदींची तपासणी करण्यात येणार आहे. तर लोकमान्य आयुर्वेदिक विभागाच्या वतीने गर्भसंस्कार, व्यंधत्व निवारण, मणक्याचे विकार, पचनाचे विकार, वजन कमी करणे, हृदय विकार, केसांचे विकार, वजन
वाढविणे, थॉयरॉईड आदी विषयी उपचार व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
थेरगाव येथील ब्लू वेल हेयरिंग केअर यांच्या वतीने कानाचा पडदा तपासणी, खाजणे, वारंवार दुखणे, कानाची ऑडिओमेट्री हे उपचार करण्यात येणार आहे. तसेच अल्प दरात कानाची मशीनही उपलब्ध करण्यात येणार आहे. तर डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या वतीने अस्थिरोग, हृदयरोग, जनरल सर्जरी, दंत तपासणी, जनरल मेडिसिन, त्वचारोग, स्त्रीरोग, कान, नाक, घसा यावर उपचार करण्यात येणार आहेत. आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या वतीने तोंडाचा कर्करोग, नेत्र तपासणी, जनरल तपासणी व ब्लड प्रेशर आदींची तपासणी करण्यात येणार आहे. शिबिराला येताना नागरिकांनी आपले आधारकार्ड घेऊन येणे आवश्यक आहे. काळेवाडी व रहाटणी प्रभागतील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराला उपस्थित राहून या आपली तपासणी करून घेण्याचे आवाहन आयोजक हरेश नखाते यांनी यावेळी केले आहे.