न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मे २०२२) :- मयत तरुणाचा विवाह झालेला होता. तरीही त्याचे १९ वर्षीय तरुणीबरोबर प्रेमसंबंध होते. त्या अगोदर तरुणीचे अल्पवयीन मुलाबरोबर देखील प्रेमसंबंध असल्याचं पुढे आले. गेल्या काही दिवसांपासून मयत तरुणाला तरुणी टाळत होती. तो मला त्रास देतो असे तरुणीने आपल्या अल्पवयीन प्रियकराला सांगितल होतं.
मयत तरुण धमकावत तुझे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल असे म्हणायचा. त्याने दोन दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलाला फोन करून तरुणीला शिवीगाळ केली. तू भेट तुला सांगतो असे धमकावत दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला.
अल्पवयीन मुलाने भावाला सोबत घेतले. त्यानंतर अल्पवयीन मुलाने तरुणाला म्हाळुंगे परिसरात भेटण्यासाठी बोलावलं. तिथं तरुणीवरून दोघांमध्ये भांडण झालं, अल्पवयीन मुलाने तरुणाच्या कानशिलात लगावली. दोन्ही अल्पवयीन भावांनी दगड आणि लोखंडी रॉडने तरूंच्या डोक्यात प्रहार करून त्याचा खून केला. संजय पाटील असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. काही तासातच दोन्ही अल्पवयीन मुलांना चऱ्होली परिसरातून दरोडा विरोधी पथकाने ताब्यात घेतलं.