- एका आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करा; कोर्टाचे आयोगाला आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मे २०२२) :- एका आठवड्यात महापालिका निवडणुका घ्या, निवडणूक कार्यक्रम जाहीर करा, असं सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला आदेश देण्यात आले आहेत.
ओबीसी आरक्षणाचा प्रश्न जोवर सुटत नाही तोवर निवडणुका पुढे ढकलण्यासाठी सरकारनं अनेक प्रयत्न केले. पण आजच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीत कोर्टानं दोन आठवड्यात महाराष्ट्रातील रखडलेल्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करा, असे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत.
तसेच तत्काळ या निवडणुका घेण्यात याव्यात असंही कोर्टानं म्हटलं आहे. त्यामुळं राज्यातील रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असला तरी या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार हे आता स्पष्ट झालं आहे.


















