न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ मे २०२२) :- अनोळखी चोरट्यांनी घराच्या मागील बाजूला असलेल्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला. घरातून २७ लाख २३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि एक लाख रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन असा एकूण २८ लाख २३ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
फिर्यादी यांचे घर शनिवारी (दि. ३०) रात्री साडेनऊ ते रविवारी (दि. १) दुपारी साडेतीन वाजेपर्यंत कुलूप लावून बंद होते. त्या कालावधीत निगडी प्राधिकरण येथे ही घटना घडली.
राघवेंद्र दत्तात्रय खेडकर (वय ५५, रा. निगडी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.


















