न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मे २०२२) :- काळ्या काचा असणा-या वाहनांवर पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला. एका दिवसात ८२३ वाहनांवर कारवाई करीत आठ लाख ७९ हजारांचा दंड वसूल केला.
दाट काळ्या रंगाच्या काचा बसवून अथवा काचांवर फिल्म चिकटवून हा उद्योग केला जातो. अशा वाहन चालकांविरोधात सोमवारी (दि. २) विशेष मोहीम राबविण्यात आली. पोलिस पथकासह आयुक्तालयाच्या हद्दीतील चौकाचौकात अशा वाहनांना थांबवून फिल्म काढून टाकत दंडात्मक कारवाई केली.
वाहतूक विभागनिहाय झालेली कारवाई व दंड पुढीलप्रमाणे :
सांगवी १५५ (एक लाख ५४ हजार ५००), हिंजवडी ३८ (३८ हजार), निगडी ३४ (३५ हजार), चिंचवड ४५ (३६ हजार ५००), पिंपरी ३६ (३७ हजार) भोसरी ९६ (एक लाख ८ हजार), चाकण ११५ (एक लाख ३० हजार ५००), देहूरोड २८ (२० हजार), दिघी-आळंदी १३ (६० हजार ५००), तळवडे ६८ (६९ हजार), वाकड ५३ (७६ हजार ७००), तळेगाव ३६ (३८ हजार), म्हाळुगे ७६ (७६ हजार).


















