- शहर कार्यकारिणीची पक्षाध्याक्षांकडे एकमुखाने मागणी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ फेब्रु.) :- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी माजी आमदार विलास लांडे यांना उमेदवारी देण्यात यावी, असा कल शहर राष्ट्रवादीत जाणवू लागला आहे. पिंपरी चिंचवड, भोसरी, खेड, शिरूर मतदार संघातून पक्षाचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांच्या नावाबाबत मागणी जोर धरू लागली आहे.
याबाबत पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीचे अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने पक्षाध्यक्ष शरद पवार यांची नुकतीच पुण्यातील बारामती होस्टेल येथे भेट घेतली.
त्यावेळी या शिष्टमंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत शहर राष्ट्रवादीकडून माजी आमदार लांडे यांच्या नावाची लोकसभेसाठी एकमुखाने शिफारस करण्यात आली. यावेळी पवारांनी येत्या १४ व १५ फेब्रुवारीला पुन्हा या विषयांवर सविस्तर चर्चा करू, असे आश्वासन दिले आहे.
बैठकीस शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक मयूर कलाटे, अजित गव्हाणे, विक्रांत लांडे, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, समीर मासुळकर, राहुल भोसले, विनोद नढे, माजी महापौर मोहिनी लांडे, माजी महापौर व नगरसेविका वैशाली घोडेकर, संगीता ताम्हाणे, पौर्णिमा सोनवणे, विनया तापकीर, माजी नगरसेवक अतुल शितोळे आदींसह माजी नगरसेवक उपस्थित होते.











