न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. ९ फेब्रु.) :- नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन व जयनाथ काटे यांच्या वतीने ज्योतिविद्या परिसंस्थेच्या अमृत महोत्सवा निमित्त पिंपळे सौदागर येथे शुक्रवार (दि. ८) रोजी “७५ तास खगोलशास्त्रीय निरिक्षण” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पिंपळे सौदागर येथील गोविंद यशदा चौकातील, छत्रपती शिवाजी महाराज लिनीअर अर्बन गार्डन येथे आयोजित कार्यक्रमात परिसरातील नागरिकांनी आपल्या मुलांसह हजेरी लावली होती.
टेलिस्कोपने सनसेटची पाहणी, टाईम लॅप्स फोटोग्राफी, आकाशातील विविध हालचाली खगोलशास्त्रीय उपकरणातून दाखविण्यात आल्या. लहान मुलांनी कुतूहलपूर्वक सर्व गोष्टी जाणून घेतल्या. मुलांना खगोलशास्त्राबद्दल खुली चर्चा आणि आकाशातील ग्रहांची पूर्ण माहिती देण्यात आली. यावेळी अभय यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.











