- तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ मे २०२२) :- आपसात संगनमत करून ‘तू आमच्या विरोधात निकाल का दिला. तू इथे नोकरी कशी करते तेच मी बघतो’ अशी धमकी देत फिर्यादीकडील कागदपत्रे हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चिखली येथे बैलगाडा शर्यती असल्याने बैलगाडा शर्यतीच्या घाटाचा पंचनामा करण्यासाठी फिर्यादी जात असताना आरोपींनी त्यांच्या गाडीची चावी हिसकावून घेतली आणि रस्ता अडवून शासकीय कामात अडथळा आणला.
आरोपीने फिर्यादी यांना ‘तुझ्यावर ॲट्रॉसिटीची केस करून तुला जेलमध्ये टाकतो’ अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना गुरुवारी (दि. ५) मंडल अधिकारी कार्यालय, लांडेवाडी भोसरी येथे घडला. अधिकारी महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार काळूराम मारुती पवार, अशोक किसन बहिरवाडे (रा. गवळीवाडा, चिंचवड स्टेशन), सागर बहिरवाडे (रा. गवळीवाडा, चिंचवड स्टेशन) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.