न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ मे २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिका क्रीडा-कला-विकास प्रकल्प संघातील सिफा वस्ताद, भूमिका गोरे आणि मनीषा राठोड यांची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
नेहरू स्टेडियम येथे २३ ते २८ एप्रिल २०२२ रोजी झालेल्या ४८ व्या कुमार गट निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पिंपरी – चिंचवड महापालिकेचा क्रीडा कला विकास प्रकल्प कबड्डी संघ विजेता झाला होता. या संघातील सिफा वस्ताद, भूमिका गोरे आणि मनीषा राठोड यांची बालेवाडी पुणे येथे ५ मे पासून सुरू होत असलेल्या ४८ व्या राज्यस्तरीय निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याच्या कबड्डी संघातून निवड झाली आहे.
या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल क्रीडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, क्रीडा अधिकारी अनिता केदारी, क्रीडा पर्यवेक्षक विश्वास गंगजे, मुख्याध्यापक चंद्रशेखर कदम, पर्यवेक्षक रामेश्वर पवार यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या आहेत. या खेळाडूना बी.जी.आटवे यांचे मार्गदर्शन लाभले. व्यवस्थापन सोनाली जाधव यांनी केले.