न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ मे २०२२) :- तरुणाने फिर्यादीच्या १३ वर्षीय मुलीला प्रेमाचे आमिष दाखवले. तिच्यासोबत फोनवर आणि व्हाट्सअपवर चॅटिंग करून तिला मॅक्झीन चौक येथे बोलावले. मित्राशी भेटवण्याच्या बहाण्याने तिला जाधववाडी येथील एका लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
काही दिवसांपूर्वी पीडित मुलीचे पाय, मांड्या व खुबा दुखू लागला. त्यामुळे मुलीला रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी मुलगी २१ आठवड्यांची गरोदर असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर मुलीने तिच्यावर आरोपीने जाधववाडी येथील एका लॉजवर नेऊन बलात्कार केला असल्याचे सांगितले.
हा प्रकार चक्रपाणी वसाहत चौक आणि जाधववाडी येथील लॉजवर घडला. पीडित मुलीच्या आईने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनिल पाटील (रा. दिघी. मूळ रा. कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.