न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ मे २०२२) :- आकुर्डीतील छत्रपती जलतरण तलाव येथे मित्रासोबत पोहण्यासाठी गेलला तरूण पोहत असताना पाण्यात बडाला. बराच वेळ होऊनही बाहेर न आल्याने त्याचा शोध घेऊन त्याला पाण्यातून बाहेर काढले.
उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कृष्णा क्षीरसागर (वय १९, रा. बॉइज् होस्टेल, निगडी, मूळ – नांदेड) असे या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
कृष्णा हा अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षात शिकत होता. रविवारी (दि. ८) सकाळी साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला. निगडी पोलीस अधिक तपास करीत आहे.