न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ मे २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने केएसबी चौक ते टाटा मोटर्स रस्त्यावर प्लागेथोन मोहमेअंतर्गत सुमारे ६.५ टन कचरा संकलन करण्यात आला.
आज सकाळी आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेत सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता आबासाहेब ढवळे, सहाय्यक आरोग्य अधिकारी बी बी कांबळे यांच्यासह टाटा मोटर्स चे अधिकारी व्ही टी पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक शांताराम माने, राजेंद्र उज्जैनवाल, आरोग्य निरीक्षक लक्ष्मण साळवे, वैभव कांचनगौडार, सचिन जाधव, शैलेश वाघमारे, विक्रम सौदाई, बिव्हीजी इंडिया, व टाटा मोटर्स चे अधिकारी यांचेसह सुमारे दोनशे कर्मचारी सहभागी झाले होते.