न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ मे २०२२) :- कृष्णानगर येथील अश्विनी रुग्णालयातील गेस्ट रूममध्ये डॉक्टर महिलेने त्यांची बॅग ठेवली होती. येथील ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना हातातील एक लाख रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या बांगड्या त्या बॅगमध्ये ठेवल्या होत्या.
दरम्यान, या बांगड्या चोरीला गेल्या. रविवारी (दि. ८) सकाळी साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली. डॉक्टर फरझाना हलीम उद्दीम अहमद (रा. डॉक्टर रेसिडेन्सी, आसाम) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. चिखली पोलिस अधिक तपास करीत आहेत.