न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०२२) :- पिंपरी आणि आकुर्डी येथील न्यायालयात शनिवारी (दि. ७) आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक न्यायालयात १ हजार २३२ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्या माध्यमातून साडेचार कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.
पिंपरी चिंचवड न्यायालय, पुणे जिल्हा विधी प्रधिकरण आणि पिंपरी चिंचवड अँडव्होकेट बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी – मोरवाडी येथील दिवाणीव फौजदारी न्यायालयात विविध २३४ खटले निकाली काढण्यात आले. त्या माध्यमातून १ कोटी २ लाख १३ हजार ६५० रुपये इतका महसूल जमा झाला.
आकुर्डी येथील न्यायालयात ९९८ खटले निकाली काढण्यात आले. त्यामध्ये ३ कोटी ५० लाख ५५ हजार ६२३ रुपये इतका महसूल जमा झाला. अध्यक्षस्थानी कार्यक्रमाच्या बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. सुहास पडवळ होते. पिंपरी न्यायालयाचे न्यायाधीश आर. काळे, न्यायाधीश आर. एस. आर वानखेडे, न्यायाधीश आर. एम गिरी, न्यायाधीश पी. सी. फटाले, न्यायाधीश एन. टी. भोसले, न्यायाधीश एस. पी कुलकर्णी यांचा सत्कार पिंपरी -चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आला.
लोक न्यायालयासाठी पॅनल अॅडव्होकेट म्हणून अॅड. पोर्णिमा मोहिते, अॅड. गीतावली जाधव, अॅड. सविता तोड़कर, अॅड. अश्विनी बंसल, अॅड. शीला शुक्ला, अॅड. प्रशांत बचुटे, अॅड. अमोल शिंदे, अॅड. सचिन मोरे, अॅड. ममता कांबळे, अॅड. वृषाली धिवार, अॅड. माधुरी तेलकर, अॅड. काजल निकम यांनी पाहिले. सर्वांचे स्वागत अडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सचिन थोपटे व कमिटीच्या वतीने करण्यात आले.
अॅडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. सुनील कडूसकर, अॅड. देवदास शिंदे आदी उपस्थित होते. असोसिएशनचे सचिव अॅड. निखिल बोडके यांनी सूत्रसंचालन केले. सहसचिव अॅड. सुनील रानवडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. थोपटे, उपाध्यक्ष अॅड. गौरव वाळुंज, सचिव अॅड. बोडके, महिला सचिव अॅड. प्रियंका सुरवसे, सहसचिव अॅड. सुनील रानवडे, खजिनदार अॅड. अनिल पवार, हिशेब तपासणीस अॅड. गोरख मकासरे, सदस्य अॅड. मंगेश खरावे, अॅड. संतोषी काळभोर, अॅड. सारिका मोरे, अॅड. ऐश्वर्या शिरसाठ, अॅड. स्नेहा कांबळे, अॅड. महेश मासुळकर यांनी केले.


















