न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील ज्येष्ठ नागरिक संघांसाठी ११६ एलईडी टीव्ही मोफत देण्यात येणार आहेत. त्यासाठी २५ लाख ५० हजार खर्च महापालिका करणार आहे. देखभाल दुरुस्तीवर लाखो रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वतीने शहरातील ज्येष्ठ नागरिक संघांना एलईडी टीव्ही देण्यात येणार आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव त्या विभागाने मध्यवर्ती भांडार विभागास दिला होता. त्यासाठी दर मागविले होते. त्यात पुण्यातील मोनार्च टेक्नॉलॉजीजचा २१ हजार ९६० रुपये एका टीव्हीचा दर पात्र ठरला. हे ३२ इंच एलईडी टीव्ही आहेत. एकूण ११६ टीव्हीचा खर्च २५ लाख ५० इतका आहे. खर्चास प्रशासक राजेश पाटील यांनी मंजुरी दिली आहे.